Narhari Zirwal : मंत्री नरहरी झिरवळ ‘नॉट रिचेबल’; पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचा आरोप
Narhari Zirwal : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले.
Narhari Zirwal : राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेताना रंगेहाथ पकडले.
राजेंद्र ढेरंग यांनी एका औषध दुकानदाराचा निलंबित परवाना पुन्हा देण्यासाठी लाच मागितली होती आणि हे पैसे स्वीकारताना ते एसीबीच्या जाळ्यात सापडले. यावरून या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र अन्न आणि औषध प्रशासन मंत्री झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले.
परंतु, आता लाच प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून तपासामध्ये अटक केलेल्या लिपीकाने मंत्री झिरवळांच्या खाजगी पीएने पैसे घेण्यास सांगितल्याचे कबुली दिल्याची माहिती आहे. त्यामुळे झिरवळ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचदरम्यान आज सकाळपासून ‘नॉट रिचेबल’ आहेत. Narhari Zirwal
मंत्री नरहरी झिरवळ यांनी या प्रकरणाशी आपला काही संबंध नाही. जर आपला संबंध यामध्ये असल्याचे सिद्ध झाले तर आपण राजीनामा देऊ. दरम्यान, या प्रकरणात आता झिरवळाच्या खासगी सचिवाचे नाव पुढे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, एसबीने अटक केलेल्या अन्न व औषध प्रशानातील कर्मचाऱ्याचे नाव राजेंद्र ढेरंगे असे आहे. तो क्लार्क पदावर कार्यरत आहे. एका मेडिकलचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी त्याने 50 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील 35 हजाराची लाच घेताना तो रंगेहात सापडला. Narhari Zirwal
हेही वाचा:





