परभणी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर आहेत. त्यांनी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली. पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राहुल गांधीनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधीनी काय केले आरोप? मी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबाला भेटलो, त्यांनी मला पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवला, व्हिडीओ दाखवले. 99 टक्के नाही तर 100 टक्के ही हत्याच आहे. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण केली. ते दलित असल्यामुळे त्यांना मारहाण झाली असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. नारायण राणेंनी लगावला टोला दरम्यान राहुल गांधी हे जेव्हा सूर्यवंशी कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले तेव्हा ते वाहानाच्या मोठ्या ताफ्यासह परभणीत दाखल झाले होते. त्यांनी अंगामध्ये निळा शर्ट घातला होता. यावरून नारायण राणेंनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. राहुल गांधींना महाराष्ट्र कळालेला नाहीये, राहुल गांधी यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तरी कळलेत का? कपड्याचा रंग निळा असला म्हणजे तो आंबेडकरवादी होत नाही. कपड्यांच्या आत त्यासाठी काहीतरी लागतं असा टोला नारायण राणेंनी लगावला आहे.