Prakash Mahajan Vs Narayan Rane | मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांना वैचारिक उंची नाही, अशी टीका करत राणे यांची तुलना लवंग आणि वेलचीशी केली होती. त्यानंतर आता भाजपाचे नेते नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. नारायण राणे यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रकाश महाजन यांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली होती. प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात. पुन्हा जर आमच्या विरोधात बोलाल तर उलट्या करायला लावेन, अशी धमकी राणे यांनी दिल्याचा आरोप प्रकाश महाजन यांनी केला आहे. त्यानंतर राणे समर्थकांनी फोन करून शिवीगाळ केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही प्रकाश महाजन यांनी केला. तसेच माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी नारायण राणे जबाबदार असतील, असेही महाजन म्हणाले. यानंतर प्रकाश महाजन यांनी थेट नारायण राणे यांना आव्हान दिले आहे. Prakash Mahajan Vs Narayan Rane | प्रकाश महाजन यांचे राणेंना ओपन चॅलेंज “मी सकाळी संभाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मी साडे दहा वाजता येऊन उभं राहतो. नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना मला जीवे मारायचं असेल तर त्यांनी मारावं. मी त्यांच्या धमकीला घाबरणारा नाही. मी महाजन आहे, हे त्यांनी विसरू नये,” असं खुलं आव्हानं प्रकाश महाजन यांनी दिले आहे. Prakash Mahajan Vs Narayan Rane | “लोकशाहीमध्ये तुम्हाला टीका सहन होत नसेल तर त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नये. मला नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांनी फोन करू नये. मी उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उभा असेल. हिंमत असेल तर त्यांनी मला जे करायचं आहे ते करावं. तसेच धमकी देणारे मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असतील तर जनतेचं काय होईल?” असा संतप्त सवालही महाजन यांनी फडणवीसांना केला आहे. Prakash Mahajan Vs Narayan Rane | नारायण राणे काय म्हणाले? नारायण राणे यांनी फेसबुकवर दिलेल्या निवेदनात म्हणाले की, श्रीयुत राज आणि माझ्या (नारायण राणे) बद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचे नाही.श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत. प्रकाश महाजन कोण? राजकारणात, समाजकारणात, विधायक क्षेत्रात आपले योगदान काय? कुठल्या एखादया पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा, जिभेचा उपयोग करु नये एवढी तुमची कुवत नाही. nbsp; श्रीयुत नितेश राणे, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता, बुध्दीमता जनमानसातील प्रतिमा या वयात सिध्द केली आहे. श्रीयुत निलेश, नितेश व नारायण राणे हे दुरच वैचारिक उंची तुम्ही ठरवणारे कोण? आमची वैचारिक उंची जनतेने ठरविली आहे. नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे. आपण किती वेळा निवडून आलात ? असे सवालही नारायण राणे यांनी विचारले आहेत. Prakash Mahajan Vs Narayan Rane | लायकी पेक्षा जास्त बोलत आहात… आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणांस योग्य रस्ता दाखविण्याचे काम मी जरुर करेन. आपण निलेश, नितेशना निष्ठा शिकविण्याची गरज नाही. तुमच्या सारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही. प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात. परत बोललात तर उलटया करायला लावेन, असा इशाराच नारायण राणे यांनी दिला. Prakash Mahajan Vs Narayan Rane | हेही वाचा: मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मनसे आक्रमक; ठाण्यात धडक मोर्चा