धक्कादायक ! नंदुरबारमध्ये सफाई कर्मचाऱ्याने केले 10 वर्षांच्या मुलीसोबत संतापजनक कृत्य

Updated On:
धक्कादायक ! नंदुरबारमध्ये सफाई कर्मचाऱ्याने केले 10 वर्षांच्या मुलीसोबत संतापजनक कृत्य

नंदुरबार : बदलापूर प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असताना आता नंदुरबारमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. यामध्ये नंदुरबार शहरातल्या एका नामांकित शाळेत कंत्राटी सफाई कामगाराने 10 वर्षांच्या मुलीला त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवल्याची घटना घडली आहे. संबंधित कर्मचारी मुलीला ग्रंथालयात घेऊन गेला होता, मा६ त्याठिकाणी महिला कर्मचारी असल्यामुळे त्याचा सगळा प्लॅन उधळला गेला.

यानंतर पीडित मुलीने शाळेमध्ये घडलेला हा प्रकार मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितला, त्यानंतर मुलीचे पालक नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. आरोपी हा 57 वर्षांचा असून मागच्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सफाईचं काम करतो.

पोलिसांनी आरोपी सफाई कर्मचाऱ्याला अटक केली आहे, पण त्याच्या छातीत दुखायला लागल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गुन्हा दाखल केला तर तुमची बदनामी होईल, असं शाळेच्या महिला मुख्याध्यापिका आणि चेअरमनने साांगितलं, त्यामुळे संपूर्ण घटनेची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला म्हणून मुख्याध्यापिका आणि चेअरमनवर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन महागात: स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा दाखल

2026-03-31 22:57:55

Santosh Pandit : महिला पत्रकाराशी गैरवर्तन महागात: स्वयंघोषित रील स्टार संतोष पंडितवर गुन्हा दाखल

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या बायकोला अटक होणार? शिर्डीतील 'ते' प्रकरण भोवणार

2026-03-31 18:37:59

Ashok Kharat Case : अशोक खरातच्या बायकोला अटक होणार? शिर्डीतील 'ते' प्रकरण भोवणार

Raigad News : रायगडमध्ये लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला अटक

2026-03-31 17:40:56

Raigad News : रायगडमध्ये लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला अटक

Congress MP Accident : अपघात की कट? काँग्रेसच्या खासदाराचा 'त्या' एकाच मार्गावर तिसऱ्यांदा अपघात

2026-03-30 16:25:30

Congress MP Accident : अपघात की कट? काँग्रेसच्या खासदाराचा 'त्या' एकाच मार्गावर तिसऱ्यांदा अपघात

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर

2026-03-28 18:45:53

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर