Nandurbar Fire : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर एमआयडीसीत कापड निर्मिती करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरातमधून ३५ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या भीषण आगीत टेक्सटाईल कंपनीचे ८ ते १० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आगीची माहिती मिळताच नवापूर नगर परिषदेकडून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र नगर परिषदेकडे केवळ एकच अग्निशमन बंब उपलब्ध असल्याने सुरुवातीला बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन व्यारा, सोनगड, साक्री, पिंपळनेर आणि नवापूर येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. Pune Crime : २१ लाखांच्या बदल्यात खेळण्यातील ५० लाखांच्या नोटा; मॅट्रिमोनिअल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीत कापड निर्मितीचे काम सुरू असतानाच अचानक आग भडकली आणि काही क्षणांतच आगीने संपूर्ण परिसराला वेढा घातला. स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला, तर आकाशात उठणारे काळ्या धुराचे प्रचंड लोट दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून दिसत होते कंपनीतील कामगार व व्यवस्थापनाने सुरुवातीला आग विझविण्याचे प्रयत्न केले, मात्र आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. ४ ते ५ स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आग विझवण्यासाठी धुळे, नंदुरबार, साक्री, पिंपळनेर आणि सोनगड येथून तब्बल ३५ अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. आठ तास उलटूनही आग धुमसतच होती. खबरदारी म्हणून परिसरातील ५० कंपन्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सुदैवाने वेळेत कामगारांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. मात्र, कंपनीत झालेल्या ४ ते ५ स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की शेजारील रिचीरीच प्रायव्हेट लिमिटेडसह अन्य काही कंपन्या आणि कार्यालयांनाही त्याचा फटका बसला. Nandurbar Fire घटनेनंतर कंपनी परिसरात वास्तव्यास असलेल्या बाहेरगावच्या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. एका कंपनीत सरासरी ५० हून अधिक कामगार कार्यरत असतात. बाहेरगावचे अनेक मजूर कुटुंबासह कंपनी परिसरातच राहत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. दरम्यान, कंपनी परिसरातील गॅस सिलिंडर व इतर ज्वलनशील साहित्य वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, सुदैवाने या आगीमध्ये कुणीही जखमी झाले नाही आणि जीवितहानी झाली नाही. मात्र नवापूर टेक्सटाईल हबमध्ये १३० हून अधिक कंपन्या असूनही स्वतंत्र आणि सक्षम अग्निशमन यंत्रणा नसल्याने उद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे. Nandurbar Fire हेही वाचा: NSSO Health Survey : सरकारी रुग्णालयांवर अविश्वास? ६४% भारतीयांची खासगी उपचारांना पसंती; ‘हा’ रिपोर्ट पाहा