नंदुरबार : नंदुरबारमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात कोंडाईबारी घाटामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एक बस आणि चार ट्रक असा मिळून पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला आहे तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. कसा घडला अपघात? गुजरात राज्याची बस सुरतहुन अंमळनेरकडे जात होती. या दरम्यान कोंडाईबारी घाटात बस आणि चार ट्रक अशा पाच वाहनांमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होती की दोन्ही ट्रकचा अक्षरश चक्काचूर झाला होता. तसेच या घटनेत 1 जण ठार झाला आहे तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच दोन ट्रक मधील केबिनमध्ये चार चालक देखील अडकले होते. या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्यावर पडलेल्या तेलामुळे हा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की एकामागून एक ट्रक एकमेकांना धडकले आहेत, तसेच सर्वांत पुढच्या ट्रकचा तर चक्काचूर झाला आहे.