Nandurbar accident । नंदुरबार जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव ट्रकच्या धडकेत तब्बल १०० मेंढ्यांचा चिरडून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वाहनाच्या कोंडाईबारी घाटात हा अपघात झाला आहे. परिणामी, रस्त्यावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडल्याचे पाहायला मिळाले. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मेंढ्यांना चिरडल्याच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भरधाव ट्रकने 100हून अधिक मेंढ्यांना चिरडले Nandurbar accident । समोर आलेल्या माहितीनुसार, धुळ्याहून सुरतच्या दिशेने जाणारी क्रमांक ए पी 31 पी जी 0869 या वाहनाने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या जवळ जवळ 100 पेक्षाही जास्त मेंढ्यांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परिणामी, रस्त्यावर मेंढ्यांच्या मृतदेहांचा खच पडला आहे. तर या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपघात झाल्याची माहिती पोलिसांना माहिती मिळताच पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाला आहे. कोंडाईबारी घाटात वारंवार अपघात होत असतात. मात्र उपायोजना शून्य दिसून येत आहेत. तर या अपघताचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. सध्या पोलीस पुढील तपास करत आहे. मात्र या या अपघातामुळे मेंढ्या पाळणाऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे. डोळ्या देखत मेंढ्यांचा शेवट पहिला Nandurbar accident । या घटनेतील मेंढ्यांचे मालक लखा गोविंदा गोईकर, बाळु सोमा गोईकर, दगडु गोईकर (रा.विजापूर ता.साक्री जि.धुळे) हे आपल्या शेकडो मेंढ्यांचा कळप घेऊन विसरवाडीच्या दिशेने गुजरात राज्यात जात होते. दरम्यान, मागून येणारा एका भरधाव ट्रकने त्याच्या 100हून अधिक मेंढ्यांना अक्षरक्ष: चिरडल्या आहेत. हा ट्रक आंध्रप्रदेश राज्याकडून गुजरातकडे जात होता. ट्रकचालक रमेश दुगंला (राजू) या ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावर हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या कळपामध्ये काही मेंढ्या या गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. स्थानिकांनी या घटनेचा रोष व्यक्त करत मोठा आक्रोश व्यक्त केला आहे. तर आपल्या घरातील सदस्याप्रमाणे मेंढ्यांचे पालन पोषण करणाऱ्या मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यूने मेंढपाळांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हेही वाचा “सबक का बदला लूंगा, फिर लौटूगा”; चिट्ठी लिहून हॉस्टेलमध्येच विद्यार्थ्याने घेतला गळफास