नंदीग्राम एक्स्प्रेसचा अपघात टळला
Updated On:

करमाड : संभाजीनगर- जालना रेल्वे मार्गावरील करमाड शिवारात रुळांवर सिमेंटचे ढापे व दगड ठेवल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 1 वाजता समोर आली. रेल्वेगाडीच्या धक्क्याने या ढाप्यांचा चुराडा झाला. दगडही बाजूला पडल्याने नंदीग्राम एक्स्प्रेसचा अपघात टळला.
गाडीच्या चाकांना ढापे लागल्यामुळे आवाज झाल्याने लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला. गाडी 100 मीटरवर थांबली. रेल्वे अनुभाग अभियंता कैलास भुवनेश्वर दास (48) यांच्या फिर्यादीवरून करमाड ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पुढील तपास फौजदार भारत निकाळजे, रेल्वे पोलिस करत आहेत.





