नांदेड । सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो

Updated On:

नांदेड : नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या सहस्रकुंड धबधब्याचं पर्यटकांना नेहमीच मोठं आकर्षण राहिलं आहे. दरवर्षी हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल असते.

यंदाही जूनच्या सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने हा धबधबा ओसंडून वाहण्यास सुरूवात झाली होती. आताही गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे हा धबधबा फेसाळला आहे. हा धबधबा पर्यटकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला हा धबधबा पर्यटक आणि स्थानिकांना रोजगार देण्यासाठी पर्वणीच ठरतो. उमरखेड शहरापासून 40, यवतमाळपासून 150 तर नांदेडपासून 100 किलोमीटर अंतरावर सहस्रकुंड आहे.

या धबधब्याला पौराणिक जोड असल्याचे सांगण्यात येते. भगवान परशुरामाने येथे बाण मारल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे या ठिकाणाला “बाणगंगा’ असंही म्हणतात. येथे नदीपात्रात वेगवेगळे लहान-मोठे अनेक कुंड आहेत. त्यामुळे याला “सहस्रकुंड’ हे नाव प्रचलित झाल्याचं स्थानिक नागरिक सांगतात.

पैनगंगा नदीवर हे ठिकाण आहे. या ठिकाणी नदीचं विस्तीर्ण पात्र आणि उंच पाषाण अशा नैसर्गिक स्थितीमुळे हा धबधबा तयार झाला आहे. सुमारे 80 फुट त्याची उंची असल्याचं सांगण्यात येतं. धबधब्याचं मनोहारी व विहंगम दृश्य पाहण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातून पर्यटक मोठ्या संख्येनं इथं येतात.

आणखी संबंधित बातम्या

Narhari Zirwal : आदिवासी तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आवाहन

2026-11-22 22:17:02

Narhari Zirwal : आदिवासी तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आवाहन

Farmer Suicide : धक्कादायक ! कर्ज वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

2026-11-16 19:17:49

Farmer Suicide : धक्कादायक ! कर्ज वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer Death : धक्कादायक ! शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीत संशयास्पद मृत्यू

2026-10-24 16:51:42

Farmer Death : धक्कादायक ! शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीत संशयास्पद मृत्यू

Nanded News : कर्जाचा डोंगर अन् मुलीच्या शिक्षणाची चिंता! व्हिडिओ पोस्ट करत नांदेडमधील शेतकऱ्याने संपविले जीवन

2026-10-21 19:10:49

Nanded News : कर्जाचा डोंगर अन् मुलीच्या शिक्षणाची चिंता! व्हिडिओ पोस्ट करत नांदेडमधील शेतकऱ्याने संपविले जीवन

Nanded News : नांदेड पोलिसांची वाळू माफियांवर मोठी कारवाई ! 13 कोटींचे साहित्य जप्त

2026-10-12 20:08:57

Nanded News : नांदेड पोलिसांची वाळू माफियांवर मोठी कारवाई ! 13 कोटींचे साहित्य जप्त