Nanded News : नांदेडमध्ये खदानीत बुडून दोघांचा मृत्यू

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील गारगव्हान येथे खदानीत बुडून दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. 15 वर्षीय संघर्ष परघने आणि 13 वर्षीय निखिल वाढवे अशी मृत मुलांची नावे आहेत. नेवरी गावातील संघर्ष परघने हा लग्नासाठी मामाच्या गारगव्हाण या गावी आला होता. मात्र, मामाचं गाव त्याच्यासाठी काळ ठरलं.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला, असून गावातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत दोघांच्या मृतदेह बाहेर काढण्याची शोधमोहीम हाती घेतली होती. संघर्ष आणि त्याचा मित्र निखिल वाढवे हे दोघे शेताकडे जात असताना पावसामुळे रस्त्यात चिखल झाला होता.
चालताना दोघांपैकी एकाचा पाय घसरून तो खदानीत पडला, त्याला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मित्र देखील या दुर्घटनेत बुडाला. या घटनेने गारगव्हान गावावर शोककळा पसरली आहे. दुसरीकडे सातऱ्यात नदीच्या बंधाऱ्यात वाहून गेलेली व्यक्ती तब्बल 36 तासांनी मृतावस्थेत आढळून आली.





