नांदेड : नांदेडच्या जयप्रकाश नारायण नगर येथील मनपा शाळेत आज अविनाश लगड युथ फाऊंडेशनच्या वतीने शाळेच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संगणक भेट देण्यात आला. फाऊंडेशनचे सदस्य किरण भणगे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी फाऊंडेशनचे संस्थापक अविनाश लगड, वाढदिवस साजरा करणारे किरण भणगे, चेतन भरेकर, विक्रांत माने, सचिन रसाळ, प्रकाश पुणेकर, शिवदत्त लगड, शुभम शिंदे, बाबा कांबळे, गौतम कांबळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची अधिक चांगली सुविधा मिळणार असून त्यांच्या अभ्यासात तांत्रिक प्रगतीला चालना मिळणार आहे.