चंद्रभागा नदीत नांदेडचा भाविक बुडाला

सोलापूर – चंद्रभागेच्या पात्रात स्नानासाठी गेलेला एक भाविक बुडून बेपत्ता झाला आहे. गोविंद जनार्धन सुवर्णकार (वय 27, रा. देगलूर, ता. जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. याबाबत सुवर्णकार कुटुंबीयांना पोलिसांना माहिती दिली आहे.

नांदेड जिल्ह्यातील सुवर्णकार कुटुंबीय रविवारी सांगोला येथे नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यास जाणार होते. पहाटे चंद्रभागेचे स्नान करून विठोबाचे दर्शन घेऊन सांगोल्याला जाण्याचा त्यांचा विचार होता. परंतु पहाटे आंघोळीसाठी नदीपात्रात गेलेला गोविंद सुवर्णकार बुडाल्याने या कुटुंबावर आघात झाला असून पोलिसांना याची माहिती दिली आहे. बुडालेल्या भाविकांचा शोध कोळी समाजातील तरूण होडीचालकांच्या मदतीने घेत आहेत.

नदीपात्रात अद्याप शोधकार्य सुरू आहे. नुकतेच उजनीतून पाणी सोडल्याने चंद्रभागेचे पात्र भरुन वाहत आहे. अवैधरित्या वाळू उपसा केल्याने नदीपात्रात अनेक मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे स्नानासाठी गेलेल्या गोविंद यास पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.