Raju Shetty | कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा पशु कल्याण केंद्रात हस्तांतरित करण्यात आल्यानंतर नांदणी गावात आणि परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे. ३० जुलै २०२५ रोजी मध्यरात्री पोलिसांच्या कडक बंदोबस्तात आणि प्राणी रुग्णवाहिकेतून महादेवीला वनताराला पाठवण्यात आले आहे. मात्र महादेवीला पुन्हा नांदणीला आणण्यासाठी ग्रामस्थ, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा माधुरी हत्ती परत आणण्यासाठी सुरु केली आहे. आज पहाटे चार वाजता निघालेल्या पदयात्रेत लोकप्रतिनिधी देखील सहभागी झाले आहेत. यात हजारो सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले आहेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी, पेटा संघटनेच्या तक्रारीवरून महादेवी हत्तीला गुजरातच्या वनताराला पाठवण्यात आले आहे. हा सर्व षडयंत्राचा भाग होता, असा गंभीर आरोप केला. जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव या मंडळीनी रचला गेला. संस्कृती, इतिहास, परंपरा, वारसा या सगळ्या गोष्टी समाज म्हणून गेल्या १२०० वर्षापासून नांदणी मठाकडून जपल्या जात आहे. राज्यात गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे शासनाचे हत्ती संगोपन केंद्र आहे. शिवाय कर्नाटक, केरळ येथेही हत्ती पुनर्वसन केंद्र असताना तो नेमका ‘वनतारा’कडे सुपूर्द करण्यास सांगितले जाण्याचे कारण काय?असा सवाल शेट्टी यांनी केला आहे. एकूणच या प्रक्रियेवर आम्हाला संशय येत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी राष्ट्रपतींनी करावी. त्यांना असलेल्या अधिकारातून हत्ती परत दिला जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे शेट्टी म्हणाले आहे. Raju Shetty | सतेज पाटील यांच्याकडून सह्यांची मोहीम कोल्हापूर जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींनी माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू केली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवण्यास सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत त्यांनी राज्यभरातून सह्या गोळा करण्याचं आवाहन केलं होतं, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तब्बल 2 लाख नागरिकांनी या मोहिमेला पाठिंबा देत आपली स्वाक्षरी नोंदवली आहे. Raju Shetty | हेही वाचा : Ajit Pawar : “दादा कोल्हापूरच्या हत्तीणीला परत आणा”; तरुणाची भरसभेत मागणी : अजित दादांनी काढली समजूत म्हणाले…