मुंबई- दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सैराट चित्रपटातून लोकप्रिय झालेला आपल्या लाडका लंगड्या म्हणजेच “तानाजी गळगुंडे’ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच लोकप्रिय धुमाकूळ घालत आहे. होय, तान्हाजी सध्या एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे.
हे कारण काय तर त्याचं न्यूड फोटोशूट. होय, तान्हाजीनं नुकतंच एका प्रसिद्ध प्रोडक्शनसाठी फोटो शूट केलं असून, त्याचा हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
शेअर केलेल्या या फोटोत तानाजी गिटार घेऊन उभा आहे. “माझ्या पायाची रचना नीट नसेल पण माझ्या संगीताची आहे…! माझे स्वत:चे सूर उत्कृष्ट आहेत.. कारण मी मी आहे..” असं तानाजीच्या या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
सैराट चित्रपटातील तानाजी गळगुंडे याची भूमिका प्रेक्षकांना नेमहीच लक्षात राहणारी आहे. विनोदी स्वभावाचा आणि परश्याला सतत मदत करणारा. असा त्याचा स्वभाव होता. तान्हाजीनं सैराट च्या दक्षिणेकडच्या रिमेकमध्ये म्हणजे “मनसु मल्लिगे’ मध्येही दमदार काम केलं आहे.