“संजय राऊत नौटंकी थांबवा अन् मर्यादा पाळा” ; नाना पटोलेंचे सडेतोड उत्तर, सांगलीचा पेच कायम

Nana Patole on Sanjay Raut। सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू, संजय राऊत यांनी असा थेट इशारा काँग्रेसला दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊतांना सडेतोड उत्तर दिले आहे. “संजय राऊत नौटंकी थांबवा अन् मर्यादा पाळा” असा सल्ला पटोले यांनी यावेळी दिलाय.
संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी, मर्यादा पाळा Nana Patole on Sanjay Raut।
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा पेच अद्याप कायम आहे. सांगली लोकसभा मतदारसंघावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक चकमक होत आहे. संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी, मर्यादा पाळा, लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करु नका, असं म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
“लोकशाही विरोधातील भाजपचं सरकार हे कशाही प्रकारे सत्येत यायला नको, यासाठी आम्ही कोणतेही परिणाम भोगायला तयार आहोत, अशी भूमिका आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे, असं असतानाही लहान कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करावं हे न पटण्यासारखं आहे, म्हणून त्यांनी त्यामध्ये सुधार करावा. सामंजस्याने मार्ग काढण्याची आमची भूमिका आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य मोठ्या नेत्याने करु नये,” असेही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
सांगलीचा प्रश्न उद्यापर्यंत सामोपचाराने सोडवू Nana Patole on Sanjay Raut।
“संजय राऊतांनी मर्यादा पाळावी, त्यांनी आपली नौटंकी बंद करावी, ते ठाकरे गटाचे मोठे नेते आहेत. संजय राऊत यांनी लहान कार्यकर्त्यांसारखे वागू नये, दोन दिवसात सांगलीचा प्रश्न सामोपचाराने सोडवू,” असंही नाना पटोले म्हणाले आहेत. त्यांनी लहान कार्यकर्त्यासारखं बोलू नये, असा सल्ला पटोलेंनी राऊतांना दिला आहे. सांगलीचा प्रश्न उद्यापर्यंत सामोपचाराने सोडवू, असंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी काल “सांगलीची जागा आमचीच आहे. इथे आमचाच उमेदवार निवडून येणार…सांगलीत आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू ” असा थेट इशारा काँग्रेसला दिला होता. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.





