पुणे जिल्हा | महसूल प्रशासनावर यंदा नामुष्की

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीची तयारी महसूल प्रशासनाने गेल्या जानेवारीपासून सुरुवात केली होती. यंदा प्रथमच भारतीय विमा निगम, नॅशनल, सहकारी बँकाचे अधिकार्यांना निवडणुकीसाठी घेण्याची नामुष्की महसूल प्रशासनावर आली.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महसुल प्रशासनासह निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या पथक प्रमुखांसह कर्मचारी वर्गाने दिलेल्या जबाबदार्या उत्कृष्टपणे समर्थपणे सांभाळल्याने निवडणुकीत प्रक्रीयेतील त्रुटी कमी करण्यात सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांत जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार प्रशांत बेडसे, यांनी योग्य उपाययोजना केल्या.
या निवडणुकीत अप्पर तहसीलदार नेहा शिंदे, निवासी नायब तहसीलदार मदन जोगदंड, महसुल नायब तहसीलदार राम बिजे, प्रांत नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे, संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार मनिषा खैरे,
निवडणुक नायब तहसीलदार डी. पी. माळी, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, गटशिक्षणाधिकारी अमोल जगंले, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर, लेखापाल व्ही.टी.काकडे आदिनी निवडणुक प्रक्रीयेतील जबाबदार्या पार पाडल्या.
दरम्यान, मतदान यत्रंणा ताब्यात घेण्यासाठी 20 टेबलवरुन करण्यात आले. तर 36 क्षेत्रीय अधिका-यांनी आपल्या अखत्यारीत मतदान केंद्रातील मतदान साहित्य कागदपत्रे जमा करुन घेतल्यानंतर मतदान केंद्रावरील साहित्य जमा केल्यानंतर कर्मचार्यांसाठी शिरुर, जुन्नर, हडपसर या भागात जाण्यासाठी एस.टी.बसेस सोडण्यात आल्या.
चार कंटेनर भरून…
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील लोकसभेच्यानं निवडणुकीत 385 मतदान केंद्रावर सोमवारी (दि. 13) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत शांततेत मतदान पार पडले. रात्री 9 वाजेपर्यंत मतदान केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी बसने दाखल झाले.
मतदान मशिन आणि मतदान साहित्य घेण्याचे काम रात्री 1 वाजेपर्यत सुरु राहिले.त्यानंतर सर्व मतदान यत्रंणा पाच कंटनेरमध्ये जमा करुन पहाटे चार वाजता राजणगाव शासकीय गोदामाकडे मोठ्या पोलिस बंदोबस्तात निवडणूक अधिकारी कर्मचार्यांसोबत रवाना करण्यात आले.





