Sushma Andhare : खरातचे भोंदूबाबाचे जग चालण्यासाठी नामकर्ण आवारे किंवा चाकणकर ही सगळी माणसे प्रयत्न करत होती. त्यामुळे ही सर्व माणसे गुन्हेगार ठरविण्यात यावं, असा गंभीर आरोप उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा खरात प्रकणावर आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. एसआयटीकडून या प्रकरणाची कसून चौकशी आणि तपास सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एसआयटीकडून शिवनिका ट्रस्टच्या आजी माजी सदस्यांची चौकशी केली जाणार आहे. या ट्रस्टवर रुपाली चाकणकर या सदस्य राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. कालच त्यांना या प्रकरणी एसआयटीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. Sushma Andhare मात्र, प्रकृतीचे कारण सांगत त्या चौकशीला हजर राहू शकल्या नाहीत. आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्या चौकशीला हजर राहतात का याकडे लक्ष असणार आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकरांवर कारवाई करण्याची मागणी सुषमा अंधारे करत आहेत. तसेच शिवनिका ट्रस्टवरील नामकर्ण आवारे यांचे नाव घेत नामकर्ण आवारे ही महत्वाची कडी असल्याचे गौप्यस्फोट सुषमा अंधारेंनी केला आहे. नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे? Sushma Andhare Sushma Andhare : ‘नामकर्ण आवारे ही महत्वाची कडी’; भोंदू खरात प्रकरणात सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट; थेट भाजपच्या मंत्र्याचे नाव घेत म्हणाल्या… आम्ही एसआयटीला भेटून सांगितलं होतं की, शिवनिकाची सर्व सदस्यांची चौकशी झाली पाहिजे. यात प्रामुख्याने 3 नावे असून ज्यात एक नाव आहे चाकणकर, नामकर्ण आवारे आणि ललित पोफळे. नामकरण आवारे ही महत्त्वाची कडी असून ती का महत्त्वाची आहे त्याचे कारण म्हणजे आवारे हा भाजप उद्योजक आघाडीचा सरचिटणीस आहे. पण सध्या त्याचे भाजपसोबत कनेक्शन दिसत नाही, तरीदेखील अद्याप त्यांची चौकशी का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? Sushma Andhare पत्रकार परिषदेत एसआयटी अजूनही रूपाली चाकणकरांना चौकशीला का बोलवत नाही? चाकणकरांना समन्स पाठवले, असे समजले. पण त्यांनी महिला असल्यामुळे मी प्रवास करू शकत नाही, असे म्हटलं. मग तुम्ही दर 15 दिवसाला नाशिकला जात होत्या तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? असा सवाल अंधारेंनी चाकणकरांना विचारला आहे. आयोगाची सर्व महत्त्वाची कामे सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जायच्या, तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसे नव्हते का? हे असे उत्तर देत असतील तर एसआयटीचा अवमान आहे. अधिकाऱ्यांचा अवमान आहे, असेही अंधारेंनी म्हटले आहे. शिवनिका संस्थांनासाठी पाण्याची पाईप लाईन देण्यासाठी तत्कालीन आघाडीच्या सरकारने मंजुरी दिली होती. त्यावरुन आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रंगले होते. अशातच संबंधित मंदिराला पर्यटनचा दर्जा देण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. हे मंदिर नुकतेच तयार झालेली आहे. ते चौकोनी आकाराचे मंदिर असून, जयकुमार रावल यांनी कोणत्या आधारावर त्याला पर्यटनाचा दर्जा दिला? असा सवाल विचारत त्यांच्याही चौकशीची मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. केसरकरांना आवाहन सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतून दीपक केसरकरांना आवाहन केले आहे. या सगळ्या प्रकरणात अशोक खरातला कोणी कोणी पोसलं हे माहिती आहे. तुम्हाला माहिती असून जर तुम्ही माहिती देत नसाल तर आणि माझं नाव आलं तर मी इतरांचं नाव घेईल, असं म्हणत असाल. याचा अर्थ तुम्ही गुन्हेगारांना लपवत आहात. त्यामुळे केसरकरांनी सर्वप्रथम सांगा की हे 39 लोक कोण आहेत, ते सांगावे. ते कोण मंत्री आहेत त्यांची नावं उघड केली पाहिजे. हेही वाचा : Huma Qureshi Zack Snyder: हॉलिवूड दिग्दर्शक जॅक स्नायडरकडून हुमा कुरेशीला खास सरप्राइज; अभिनेत्रीने दिलं गोड उत्तर