बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीचे नाव आले समोर

मुंबई : बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीचे आता नाव समोर आले आहे. मोहम्मद जसीन अख्तर असे त्या आरोपीचे नाव आहे. पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील शंकर गावाचा तो रहिवाशी आहे.
अख्तरवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये खून, दरोडा, हत्यारे चोरी करणे अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे. मोहम्मद जसीन अख्तरवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन पंजाबनंतर आता हरियाणा पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
जसीनला २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. जालंधर पोलिसांनी पहिल्यांदा त्याला अटक केली होती. पण सुटल्यानंतर तेव्हापासून तो आपल्या गावी परतलेलाच नाही. जसीन अख्तरच्या गुन्ह्यांची मुळे पंजाब आणि हरियाणामध्ये पसरलेली आहेत. त्याचे गुन्हेगारी नेटवर्क बरेच मोठे आहे.
तो लॉरेन्स बिश्नोई टोळीशीही संबंधित आहे. जसीनने विक्रम ब्रारच्या सांगण्यावरून पंजाबमधील दोन डेरा प्रेमींची रेकीही केली होती.जसीन अख्तर हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या थेट संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे.





