Nagthane ZP Election : नागठाणे जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अजित सदाशिव साळुंखे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्ष संपर्क कार्यालयाचा शुभारंभ अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमामुळे नागठाणे गटातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रचार यंत्रणेमध्ये समन्वय रहावा …नागरिकांना भेटता यावे व प्रचारातील सुत्रबद्धते साठी कार्यालय उपयोगी ठरणार आहे. यावेळी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करताना यशवंत साळुंखे म्हणाले की, “नागठाणे गटातून भाजपचे अधिकृत उमेदवार अजित साळुंखे सर हे एक सुशिक्षित, अभ्यासू आणि सर्वसामान्यांशी थेट संपर्क असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या कार्यशैलीवर जनतेचा विश्वास असून ते निश्चितच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.” त्यांनी भाजपच्या विकासात्मक धोरणांचा उल्लेख करत मतदारांनी भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. अजित साळुंखे सर यांनीही यावेळी उपस्थितांचे आभार मानत सांगितले की, नागठाणे गटातील सर्व गावांचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असून शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व मूलभूत सुविधांसाठी सातत्याने काम केले जाईल. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर गावातून भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपच्या घोषणांनी आणि कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण सहभागाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.