Railway Accident : मध्य प्रदेशातील बालाघाटहून इतवारीकडे जाणारी एक रेल्वेगाडी रविवारी नागपूरजवळ रुळावरून घसरली. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत कलमना आणि कामठीदरम्यान रात्री ९.४५ च्या सुमारास घडलेल्या या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. Railway Accident याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बालाघाट-इतवारी रेल्वेच्या पहिल्या डब्याची (कोचची) पुढील दोन चाके रुळावरून खाली घसरली. ही गाडी नियंत्रित वेगाने धावत असल्याने कोणतीही गंभीर हानी किंवा जीवितहानी टळली. Railway Accident Railway Accident : नागपूरजवळ मोठा रेल्वे अपघात टळला! बालाघाट-इतवारी रेल्वेची चाके रुळावरून घसरली गाडीतील प्रवासी सुखरूप राहिले आणि रेल्वे वाहतुकीवरही फारसा परिणाम झाला नाही. या घटनेची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाडी रुळावरून घसरण्यापूर्वीच मोठा आवाज झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच यामुळे गाडीच्या एका डब्याचे एक चाक खराब झाल्याचेही आढळून आले. Railway Accident