Nagpur News : नागपूर पोलिसांची मोठी कारवाई ! 32 लाखांचे मेफेड्रोन जप्त

नागपूर : नागपूर पोलिसांनी धडक कारवाई करीत ३२ लाखांचे मेफेड्रोन पकडले. यूनिट क्र. १ पथकाने बर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करीत नागपूर-मुंबईच्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी हनुमान गल्ली स्थित हाॅटेल कन्हैयामध्ये धाड घालून वसिम खान वल्द इमदात खान (वय ३७, गोवंडी मुंबई), फक्रुद्दीन उर्फ खिल्ली मनुद्दीन कुरेशी (वय २६, गोवंडी), ईस्ट मुंबई व अब्दुल वसीम अब्दुल नवाब शेख (वय ३४, तहसील, नागपूर शहर) यांना अटक केली.
पोलिसांनी आरोपींजवळून ३१ लाख ५ हजाराचे ६१८ ग्राम एम.डी. मेफेड्रोन पावडर जप्त केले.वसिम खान वल्द इमदात खान व फक्रुद्दीन उर्फ खिल्ली मनुद्दीन कुरेशी हे मुंबई येथून मोठ्या प्रमाणात एम. डी. अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी नागपूरला येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने हाॅटेल कन्हैया येथे सापळा लावला होता.
पोलिसांनी तिथे छापा टाकला असता त्यांच्याकडे अंमली पदार्थ मिळून आला. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी ५० लाखांच्या मेफेड्रोनसह अफीम आणि गांजाही पकडला होता. यूनिट क्र. ४ पथकाने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करीत ५० लाखांचे मेफेड्रोन पकडले होते.





