Nagpur municipal corporation। राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर या चार महानगरपालिकांचा समावेश होतो.त्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बालेकिल्ला म्हणून नागपूर महानगरपालिकेकडे पाहिले जाते. यंदा झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप आपली सत्ता मिळणार का? हे आजच्या निकालावरून ठरणार आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी १५१ नगरसेवकांच्या जागांसाठी मतदान पार पडले आहे. कोणत्याही पक्षाला बहुमतासाठी निम्म्याहून अधिक जागा जिंकणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा बालेकिल्ला असून, फडणवीस आणि गडकरी पालिकेवर वर्चस्व टिकवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. यावेळी नागपूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने भाजपासोबत युती केली आहे. याठिकाणी अजित पवार, शरद पवार, वंचित आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढत आहेत. Nagpur municipal corporation। दरम्यान, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नागपूर पालिकेत काँग्रेसला २२-३० जागा तर, भाजपसोबत युतीत असलेल्या शिवसेनेला ६ ते ७ जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १ -२ जागांचा अंदाज आहे. विदर्भ फडणवीसांचे होमग्राऊंड मानले जाते. विदर्भात निर्विवाद वर्चस्व आबाधित ठेवण्यासाठी फडणवीसांनी जोरदार प्रयत्न केल्याचे मतदानापूर्वी दिसून आले आहे आठ वर्षानंतर भाजप पुन्हा सत्ता स्थापन करणार का? २०१७ साली पालिकेत भाजपची सत्ता होती. भाजपने गेल्या निवडणुकीत १०८ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा गाठला होता. तर, काँग्रेसला २९ आणि बहुजन समाज पक्षाला केवळ १० जागा जिंकता आल्या होत्या. २०१७ साली या पालिकेत भारतीय जनता पक्ष (BJP) पक्ष ४८ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसला (INC) १३ जागा मिळाल्या होत्या तर शिवसेनेला ८ जागा जिंकता आल्या. Nagpur municipal corporation।