Nagpur News : जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात रविवारी सकाळी सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन अतुल उर्फ बंटी पानतावणे (४०) या तरुणाचा मृत्यू झाला असून, सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. (Nagpur News) पोलीसांच्या माहितीनुसार, पानतावणे कुटुंबीय सकाळी घरात असताना स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे प्रथम आग लागली आणि नंतर अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. अतुल पानतावणे यांच्या पत्नी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता, ही आग लागली. (Nagpur News) काही क्षणातच जोरदार स्फोट झाला. ही आग स्फोटानंतर काही वेळातच संपूर्ण घरात पसरली. घरातील जीवनावश्यक वस्तू, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रिज, कपडे यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग लागल्यानंतर पत्नी व मुले तात्काळ घराबाहेर पडण्यात यशस्वी झाली. मात्र, अतुल पानतावणे हे बेडरूममध्ये अडकून पडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. आग विझवण्याच्या प्रयत्नात विनय पानतावणे, नितीन पानतावणे तसेच संध्या ढवळे यांच्यासह इतर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. (Nagpur News) सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी मृताच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. (Nagpur News)