‘ईद’च्या मुहूर्तावर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; नागपूर हज हाऊससाठी ‘इतक्या’ कोटींची तरतूद
Updated On:

नागपूर – ईदच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने नागपूर हज हाऊससाठी मोठी घोषणा केली आहे. हज हाऊसच्या सौंदर्यीकरण आणि सुधारणेसाठी सरकारने 1.2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. अल्पसंख्यक विभागाने याबाबत माहिती दिली. त्यानुसार, हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम यात्रेकरूंसाठी नागपूरमध्ये हज हाऊस बांधण्यात आले आहे. हे हज हाऊस 2012 पासून कार्यरत असून, दरवर्षी 1000 ते 1500 यात्रेकरू येथून हज यात्रेला जातात. येथे यात्रेकरूंना राहण्याची तात्पुरती व्यवस्था आणि हज प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे.
कशासाठी निधी?
अल्पसंख्यक विभागाने सांगितले की, नागपूर हज हाऊसच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी, समोरील जागेत पार्किंग व्यवस्था आणि सौंदर्यीकरणासाठी 1.20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सुधारणांमुळे यात्रेकरूंना अधिक चांगली सुविधा मिळेल.




