नागपूर : जिल्ह्यातील बाजारगाव येथे असलेल्या सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मयूर गणवीर असे मृत कामगाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोलार एक्सप्लोसिव्ह इंडस्ट्री नागपूर अमरावती मार्गावरील बाजारगाव या ठिकाणी आहे. कंपनीतील स्फोटात एकूण १७ कामगार जखमी झाले आहेत तर मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांब पर्यंत उडाले आणि त्या मलब्याच्या आघाताने अनेक कामगार जखमी झाले. तर, या कंपनीत असलेल्या लोखंडी मशिनचे तुकडे सुद्धा ५०० मीटरपर्यंत उडाले. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेतील जखमींना तत्काळ नागपूरच्या विविध मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास सीबी वन या प्लांटमध्ये स्फोट होण्यापूर्वी काही प्रमाणात धूर निघत होता. ही बाब या कंपनीत काम करणा-या अनुभवी कामगारांच्या लक्षात आली. पण काही कामगार वेळेत पडू शकले नाही, ज्यामुळे ते स्फोटानंतर मलब्याखाली दबले गेले.