Nagpur Accident : नागपूरमध्ये भीषण अपघात ! पिक-अप जीप उलटून 26 जण जखमी
नागपूर जिल्ह्यात (Nagpur Accident) वर्धा नदीजवळ सोमवारी भरधाव वेगाने जाणारी एक पिक-अप जीप उलटल्याने ९ महिलांसह एकूण २६ मजूर जखमी झाले आहेत.

Nagpur Accident : नागपूर जिल्ह्यात (Nagpur Accident) वर्धा नदीजवळ सोमवारी भरधाव वेगाने जाणारी एक पिक-अप जीप उलटल्याने ९ महिलांसह एकूण २६ मजूर जखमी झाले आहेत. या वाहनात प्रमाणापेक्षा जास्त मजूर भरलेले होते आणि ते बेलौना गावाच्या दिशेने निघाले होते.
मोवाड येथील वर्धा नदीजवळ (Nagpur Accident) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला.
स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत केली. अपघाताची माहिती मिळताच नरखेड पोलीस ठाण्यातील एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी जखमींना नागपूर (Nagpur Accident) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.






