नगर -नवव्या दिवसाच्या उपोषणाला महिलांची भर
Updated On:

नगर – महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी उपोषण सुरू असून आज नवव्या दिवशी महिला कर्मचारी सर्व कामकाज बंद ठेवून उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, राज्य सरकारची कॅबिनेट बैठक असून त्या निमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विविध खात्याचे मंत्री मुंबई येथील मंत्रालयात उपस्थित राहत असल्यामुळे सर्वांच्या नजरा सातवा वेतन आयोगाला मंजुरी मिळण्याकडे आहेत.
उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत चालली असून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी महिलांनी केली. उपोषणकर्ते बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, बाबासाहेब राशिनकर यांना पाठिंबा देण्यासाठी नंदकुमार नेमाने व अजय सौदे या दोघांनी उपोषण सुरू केले आहे.





