Nagar : दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

अहिल्यानगर : एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना केडगाव व नगर तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी कोतवाली व नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केडगाव उपनगरात राहणारी अल्पवयीन मुलगी (वय 17) गुरूवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. घरातील काही कारणावरून आई आणि मुलीचा किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर फिर्यादी आणि आई दोघी बँकेत कामानिमित्त गेल्या असता मुलगी घरी एकटीच होती. मात्र परत आल्यानंतर ती घरात दिसली नाही.
तसेच हॉलमधील एका कोपर्यात मी घर सोडून जात आहे असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. मुलीचे अपहरण केल्याचा संशय फिर्यादीतून व्यक्त करण्यात आला असून पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.
नगर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी (वय 16) तिच्या घरी असताना तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या संशय तिच्या आईने व्यक्त केला आहे. तशी फिर्याद त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुरूवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे हे मुलीचा शोध घेत आहेत.





