Nagar : कत्तलीसाठी गोवंश वाहतूक करणारा टेम्पो पकडला

पाथर्डी : कत्तल करण्यासाठी एक गोवंश घेऊन जाणाऱ्या छोटा टेम्पोसह गोवंश पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी आशितोष सतीश शर्मा यांच्या तक्रारीवरून सोहेब मतिन शेख (रा. ब्रम्ह येळंब), अन्सार नवाब शेख (रा. घाटशिळ पारगाव ता.शिरुर कासार जि. बीड) या दोघाविरोधात विविध कलमान्वये पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गोसेवक तथा गोरक्षण समितीचे शर्मा यांनी तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी दुपारी गणेश जवरे (रा. खरवंडी), भरत सानप (रा. भगवानगड) यांचा शर्मा यांना फोन आला की, छोटा टेम्पो गाडीत पाथर्डी तालुक्यातील खरवंडी शिवार- ढाकणवाडी फाटा येथे एक देशी गोवंश वाहतूक होत आहे.
शर्मा हे लगेच ढाकणवाडी फाट्यावर गेले. त्याठिकाणी टेम्पो गाडी उभी होती. त्या गाडीची शर्मा, जवरे, सानप यांनी पाहणी केली असता गाडीमध्ये देशी गोवंश बांधलेला होता.
क्रूरपणे डांबून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करताना दिसून आले. गोवंश कत्तलसाठी आमचे गावी घेऊन चाललो आहे, असे सोहेब शेख यांने सांगितले.





