Nagar : आदर्श गाव हिवरे बाजार सोसायटीची कर्जवसुली शंभर टक्के

नगर : आदर्श गाव हिवरे बाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची मार्चअखेर शंभर टक्के कर्ज भरण्याची परंपरा यंदा 16 व्या वर्षीही कायम राहिली आहे.
सर्व सभासदांनी ३ कोटी 6 लाखरुपये पिककर्ज भरणा करून कर्जाची परतफेड केली. गेली 16 वर्षापासून १०० टक्के कर्ज भरण्याची परंपरा जोपासणारे हिवरे बाजार हे एकमेव गाव आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सभासदांना 15 टक्के लाभांश वाटप करण्यात आला.
आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १०० टक्के वसुलीचे प्रयत्न यशस्वी ठरले. प्रत्येक सभासदाने कर्जाची रक्कम भरून खाते नियमित करून घेतले.
यासाठी सोसायटी सभासदांच्या सहकार्यांबरोबरच सोसायटीचे चेअरमन छ्बुराव ठाणगे, व्हा चेअरमन रामभाऊ चत्तर, सरपंच विमल ठाणगे, एस.टी. पादिर, रो.ना.पादिर, अर्जुन पवार, दामोधर ठाणगे, अशोक गोहड , सहदेव पवार, बाबा गुंजाळ, राजू सहादू ठाणगे, संदीप गुंजाळ तसेच सोसायटीचे सचिव कुशाभाऊ ठाणगे आदींनी परीश्रम घेतले.





