नगर : नेवाशात राष्ट्रवादीकडून भाजपाच्या इच्छुकांची इमेज डॅमेज झाल्याचा कांगावा?

शिवसेनेला ही जागा घेण्यासाठी मुख्यमंञी शिंदे यांच्याकडे साकडे!
राजकीय गोंधळात महायुतीचे इच्छुक उमेदवार अन् पदाधिकारी…
आमदार गडाख यांच्या एका समर्थकाने उमेदवारीसाठी घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट!
नेवासा : स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघात भाजपाच्या पक्षांतर्गत कलहामुळे काही इच्छुक असलेल्या भाजपा नेत्यांची इमेज डॅमेज होत असल्याचे कारणे आता पुढे करुन महायुतीचा मिञ पक्ष असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे) गटाकडे स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघाची जागा वळविण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी थेट मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाकडूनही आता ही जागा राष्ट्रवादीला मिळण्यासाठी पडद्याआडून जोरदार मास्टर स्ट्रोक देण्याची व्युहरचना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आखली जात असल्यामुळे राजकीय रणांगणात महायुतीची पडद्याआडून मोठी राजकीय खेळी रंगल्याचे स्पष्ट चिञ राजकीय आखाड्यात दिसून येत अाहे त्यामुळे महायुतीची ही जागा नेमकी कोणत्या पक्षाला जाणार?आणि कोणत्या उमेदवाराला या मतदार संघात मिळणार? आणि कोण उमेदवार आ.गडाख यांच्या विरोधात राजकीय फाईट देणार? याबाबत मतदार संघात प्रचंड उत्सुकत्ता मतदारांमध्ये निर्माण झालेली आहे.
तर महायुतीच्या उमेदवारीवरुन पक्षीय फैसला अद्याप निश्चित नसल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार राजकीय संभ्रामात असून नेतेमंडळी आणि पदाधिकारीही आता कोड्यात सापडलेले आहेत? त्यामुळे आता या मतदारांमध्ये उमेदवारीवरुन मतदारांतूनच अनेक तर्क – विर्तक बांधले जात आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार राज्याचे माजी मंञी दिग्गज नेते आमदार शंकरराव गडाख सध्या नेवासा मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दररोज जनतेच्या संपर्कात येत असल्यामुळे आ.गडाख यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार असणार? आणि कोण?आ.गडाख यांना राजकीय फाईट देणार? याबाबत मतदार संघात प्रचंड उत्सुकत्ता निर्माण झालेली आहे.
महाविकास आघाडीकडून स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघात दिग्गज नेते राज्याचे माजी मंञी आ.शंकरराव गडाख सध्या तालुका पिंजून काढत असतांनाच भाजपातील अनेक इच्छुक उमेदवारही आता स्वतंञपणे मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत त्यामुळे भाजपात मोठा पक्षांतर्गत मतभेद निर्माण झालेला असल्यामुळे शिवसेना ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे तर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीही स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघासाठी ही जागा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांना साकडे घालत असल्याचे पदाधिकाऱ्यांडून सांगण्यात येत आहे.
त्यामुळे राष्ट्रवादीचे युवानेते अब्दुल शेख यांनी राजकीय मैदानात उतरण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले असून भाजपात उमेदवीरीवरुन मतभेद होत असल्याचे कारण पुढे करुन आणि शिवसेनेकडे दमदार उमेदवार नसल्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडे घेण्यासाठी युवकनेते शेख प्रयत्न करतांना दिसून येत आहेत त्यामुळे महायुतीचा अद्यापही उमेदवारीवरुन घोळ सुरु असून महाविकास आघाडीचे दिग्गज नेते आ.गडाख यांचा तालुक्यात झंजावती प्रचार दौरा जोमात सुरु असल्याचे दिसून येत असून आ.गडाखांनी आता प्रचारात मोठी आघाडी घेतलेली असतांना या जागेवरुन महायुतीमध्ये अद्यापही घोळच सुरु असल्यामुळे इच्छुक उमेदवारही माञ संभ्रमात असल्याचे दिसून येत आहेत.
मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ही जागा महायुतीकडून घेवून आपल्याला जर उमेदवारी मिळाली तर तालुक्यातील २५ ते ३० विद्यामान सरंपच बरोबर घेवून पक्षात जाहीर प्रवेश करु आणि आ.गडाख यांच्या विरोधात दमदार राजकीय फाईट देवू? असे एका आ. गडाख समर्थकांनी नुकतीच शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची पदाधिकाऱ्यांसमवेत भेट घेवून आपली आ.गडाखांविरोधात लढण्याची तयारी आहे माञ तिकीट मिळाले तरच आपले राजकीय पत्ते खुले करणार? असल्याचे या एका पदाधिकाऱ्यांनी खासदार शिंदे यांच्या भेटीत आपला मनोदय व्यक्त केल्यामुळे राजकीय आखाड्यात चांगलेच चर्चेचे काहूर माजल्याची जोरदारपणे चर्चा राजकीय रणांगणात सुरु झालेली आहे.
आ.गडाख यांचा समर्थक असलेला हा पदाधिकारी सद्यस्थितीत पडद्याआडून आपली राजकीय सुञ हालवित असून त्याच्या जोडीलाही अन्य पदाधिकारी त्यांची साथ देत असल्याचे राजकीय रणांगणात बोलले जात आहे त्यामुळे आ.गडाख यांच्या विरोधात हा पडद्याआडील समर्थक सध्या शिवसेनेकडून उमेवारी मागत असून गुरुवरच विद्या उलटविण्याच्या प्रयत्नात असल्याची खमंग राजकीय चर्चाही आता राजकीय आखाड्यात गुप्तपणे सुरु झालेली असून या समर्थकाने नुकतीच शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांने भेट घेतल्याची माहीतीही समोर येत असून या समर्थकाच्या मागे तालुक्यातील २५ ते ३० विद्यमान सरपंच आणि पदाधिकारी असून तिकीटाचा गेम फिक्स झाला तरच आपली राजकीय भुमीका हा समर्थक उघड करणार असल्याची चर्चाही विश्वासनिय सुञांकडून बोलली जात असल्यामुळे राजकीय आखाड्यात पडद्याआडून वेगळेच काही शिजत असल्यामुळे राजकीय आखाड्याने चांगलाच पेट घेतल्याचे चिञ दिसून येत आहे.
महायुतीची जागा शिवसेनेच्या वाट्याला घेवून मला उमेदवारी द्या,तालुक्यातील २५ – ३० सरपंचांना बरोबर घेवून शिवसेनेत जाहिर प्रवेश करतो? निवडणुकीसाठी पैसाही लावतो? माञ उमेदवारी मलाच द्या, हे फिक्स असेल तर माझी राजकीय भुमिका जाहीर करतो? असे साकडे आ.गडाख यांच्या एका समर्थक पदाधिकाऱ्याने नुकतेच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीत घातल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय पटलावर सुरु झाली असून अनेक राजकीय तर्कवितर्कांना तालुक्यात मोठे उधाण आलेले आहे.
आता राष्ट्रवादीचाही मास्टर स्ट्रोक….
भाजपाच्या पक्षांतर्गत कलहामुळे त्यांच्या इच्छुक उमेदवारांची इमेज डॅमेज झालेली असून आणि शिवसेनेकडे पावरफुल्ल उमेदवार नसल्यामुळे महायुतीने ही जागा आता राष्ट्रवादीकडे वळविण्याची मागणी आमचा पक्ष राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याकडे करत असल्याची माहीती एका विश्वासनिय पदाधिकाऱ्याने दैनिक प्रभात’शी संवाद साधतांना दिली.





