नगर – शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचे अमिष ६६ लाखांची फसवणूक

नगर – शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगर मधील एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल ६६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत प्रकाश दत्तात्रय कुकडे (रा. सावेडी) यांनी शुक्रवारी नगर च्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुकडे यांच्या व्हाॅटसअप वर रिचा सेठी नावाच्या महिलेचा शेअर ट्रेडिंग बाबत मेसेच आला होता. फिर्यादी यांनी याबाबत त्या महिलेकडून शेअर मार्केट बाबत अधिक माहिती घेतली.
त्या महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन करून अधिक नफा मिळून देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी रिचा सेठी यांनी सांगितलेल्या बॅंक खात्यात वेळोवेळी तब्बल ६६ लाख ५५ हजार रुपये पाठविले. ही घटना २० मार्च २०२४ ते १२ मे रोजी घडली. मात्र फिर्यादी यांनी पैसे मागण्यास सुरवात केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिले.
फिर्यादी यांना नफा मिळाला नाही व गुंतवणुक केलेली रक्कम देखील परत मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस साठाण्यात गुन्हा दाखल केला.




