जामखेड : जामखेड महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ.सुनील पुराणे यांची संस्थेने नियुक्ती केली. याबद्दल जामखेड येथील काका ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. डॉ. सुनील पुराणे हे 1991 पासून जामखेड महाविद्यालयात गणित विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यांनी पुणे विद्यापीठामधून एम.एससी. व पीएच.डी. प्राप्त केलेली आहे तसेच 2008 मध्ये एम.फिल. प्राप्त केली आहे. महाविद्यालयामध्ये त्यांनी एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी विकास अधिकारी, नॅक समन्वयक, पुणे विद्यापीठाच्या गणित बोर्डात अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून 2018 ते 2023 पर्यंत काम पाहिले आहे. नेहमीच विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या विकासामध्ये त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. महाविद्यालयामध्ये वृक्षारोपन करून महाविद्यालयाचा परिसर हिरवागार केला आहे. नुकतीच संस्थेने त्यांना प्रभारी प्राचार्य पदाची जबाबदारी सोपविली आहे.याबद्दल काका ग्रुपचे वसंतराव राळेभात, माजी प्राचार्य अविनाश फलके, डॉ.सुनिल नरके, विनफिन गुरूकुलम संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र ढवळे, संचालक प्रा. बाळासाहेब पुराणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष तुकाराम अंदुरे राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ तनपुरे, साई स्टोन क्रेशरचे संचालक राजेंद्र शिरोळे, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी सचिन लोहकरे, माजी तहसीलदार राजेंद्र दराडे. सिव्हिल इंजिनिअर संतोष बोबडे, प्रा.केशव कोल्हे, नामदेव भोसले, अच्युत शिंदे, विजय डोंगरे, भगवान समुद्र, दीपक ढवळे, संभाजी खोटे आदी उपस्थित होते.