नगर – हद्दपार असलेला आरोपी जेरबंद कोतवाली पोलिसांत गुन्हा
Updated On:

नगर – नगर शहरातून हद्दपार केलेल्या एकाला कोतवाली पोलिसांनी पकडले. चैतन्य अनिल गाडळकर असे ताब्यात घेतलेल्या तरूणांचे नाव आहे. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आह. विशाल अशोक दळवी यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई स्मृती कॉलनी परिसरात करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाला नगर शहरातून हद्दपार करण्यात आले होते. तो नगर शहरातील त्यांच्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत या इसमाला पोलिसांनी पकडले. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.





