संगमनेर : ऊस आणि दूध हे शाश्वत पीक असून एकरी उत्पादन वाढीसाठी आगामी काळात नवीन ए आय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहोत. संगमनेर तालुका हे कुटुंब असून यश मिळवण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. परमेश्वराच्या आशीर्वादाने कारखान्याची व सहकाराची चांगली वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025 – 26 या गळीत हंगामासाठी पहिल्या मिल रोलरचे पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, रणजितसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संचालक संपतराव गोडगे, इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ.तुषार दिघे, विनोद हासे, रामदास धुळगंड, विलास शिंदे, रामनाथ कुटे,नवनाथ आरगडे, विजय राहणे, गुलाब देशमुख, अरुण वाकचौरे, योगेश भालेराव, अंकुश ताजने, दिलीप नागरे, लता बाबासाहेब गायकर, सुंदराबाई रावसाहेब डूबे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. थोरात म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादन वाढले पाहिजे, याकरिता ऊस विकास मेळाव्याचे आयोजन सुरू आहे. आगामी काळामध्ये एकरी उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. याचबरोबर लागवड करताना टप्प्याटप्प्याने केली पाहिजे. 86032 हा ऊस नव्या तंत्रज्ञानानुसार अगदी 12 ते 13 महिन्यांत काढण्यासाठी येऊ शकतो. कमी पाणी, कमी श्रम आणि जास्त उत्पादन हे तत्व अवलंबताना कार्यक्षेत्रामध्ये जास्तीत-जास्त ऊस उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, यावर्षी कार्यक्षेत्रामध्ये कमी ऊस असल्याने आव्हान मोठे आहे. चांगला भाव देण्यासाठी कार्यक्षेत्रात जास्त ऊस उत्पादन होणे गरजेचे आहे. कारखान्याने ऊस उत्पादन वाढीकरता विविध अनुदान योजना सुरू केल्या असून, सेंद्रिय खत सुद्धा उपलब्ध आहे. आगामी गाळपाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने मशीनचे ओव्हर ऑइलिंगची सर्व कामे, ऊस तोडणी, वाहतूक, मजूर ही सर्व कामे योग्य वेळेत पूर्ण करू असे ते म्हणाले. याप्रसंगी विष्णू ढोले, रामनाथ शिंदे, नामदेव शिंदे, बाबजी वामन, संभाजी वाकचौरे, शिवाजी जगताप,प्रा.बाबा खरात, अनिल सोमणी, अशोक मुटकुळे, नवनाथ गडाख, भाऊसाहेब खर्डे, अशोक कवडे आदींसह सर्व विभागप्रमुख, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर व्हा.चेअरमन पांडुरंग घुले यांनी आभार मानले.