नगर – १० दिवसांच्या विश्रांतीनंतर नगर शहरासह तालुक्यात पावसाची हजेरी
Updated On:

नगर – गेल्या काही दिवसाच्या विश्रांतीनंतर नगर शहरासह तालुक्यात विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागात शुक्रवारी (दि.२०) रोजी सायंकाळ पासून तर काही भागात रात्री ९ पासून सुरु झाला. या पावसामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. हवामान विभागाने शनिवारी (दि.२१) रोजी नगर जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला होता. मात्र, त्या आधीच पावसाने हजेरी लावली.





