पारनेर,(प्रतिनिधी) – खा. नीलेश लंके व जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार) यांच्या वतीने पारनेर शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील मोलमजुरी, कष्टकरी शेतकरी महिला, तरुणी, ज्येष्ठ महिला वर्गाला मोहटादेवी दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब शेटे व सचिन नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रभाग क्रमांक नऊमधील महिलांना मोहटादेवी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीला प्रस्थान करतेवेळी नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिक्षक नेते रा. या. औटी, माजी उपसरपंच अनुसया गायकवाड, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र गटणे, अरूण जाधव, राष्ट्रवादी नेते राजेश चेडे, जाकिर शेख, ज्ञानदेव कानडे, रघुनाथ व्यवहारे, सचिन बुगे आदीसह प्रभागातील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.