Nagaland Assembly Elections 2023 : केंद्रात पुढचे सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच स्थापन होईल; खर्गेंनी केला दावा

दीमापुर : नागालँड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी दावा केला की, 2024च्या लोकसभा निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवेल आणि केंद्रात पुढचे सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच स्थापन होईल.
खर्गे पुढे म्हणाले की, याबाबत इतर पक्षांशी चर्चा सुरू आहे. आम्ही लोकशाही आणि संविधानाचे पालन करणारे आहोत. कर्नाटकात आमचे बहुमत होते, पण भाजपने 17-18 आमदार विकत घेतले आणि त्यांचे राजीनामे घेऊन सरकार स्थापन केले. ते म्हणाले की भाजपाने अशाचप्रकारे मध्य प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड सर्वत्र दबाव निर्माण केला आहे.
In 2024, an alliance Govt shall be formed in the Centre.
Congress will lead that alliance. pic.twitter.com/WRIac7kzMH
— Mallikarjun Kharge (@kharge) February 22, 2023
ते म्हणाले की, भाजप एकीकडे लोकशाही आणि संविधानाच्या गप्पा मारते, मात्र दुसरीकडे त्यांची सर्व कामे अलोकतांत्रिक आहेत. भाजपवर निशाणा साधत खर्गे म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारकडे नागा राजकीय प्रश्नावर मान्य केलेले उपाय लागू करण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही. भाजप सरकारने नागालँड आणि देशातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपला नागा जमातीची सांस्कृतिक ओळख नष्ट करायची आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/aap-candidate-shelly-oberoi-elected-delhis-new-mayor/
न्याय मिळण्याची हीच वेळ
खर्गे म्हणाले, नागांची स्वदेशी आणि अनोखी संस्कृती नष्ट करणे हे भाजपच्या राजकारणाचे उद्दिष्ट आहे. तुमच्या संस्कृतीवर होणाऱ्या हल्ल्याच्या आणि ध्रुवीकरणाच्या आणि द्वेषाच्या राजकारणाविरुद्ध तुम्हाला उभे राहावे लागेल. ते म्हणाले की, एनडीपीपी, एनपीएफ आणि भाजपने गेल्या 20 वर्षांपासून लूट केली आहे. आता वेळ आली आहे की लोकांना न्याय मिळावा आणि लोकांसाठी काम करणारे सरकार असावे.



