जळगाव : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी येत्या 21 मे रोजी राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाने मला संधी द्यावी अशी मागणी केली आहे. राज्याच्या राजकारणात मला रस असून माझा पक्षाने विचार करावा असं खडसे म्हणाले. ते जळगाव इथं आले असता त्यांनी अशी इच्छा बोलून दाखवली. पक्षाने मला राष्ट्रीय राजकारणात संधी दिली होती मात्र मला राष्ट्रीय राजकारण रस नसल्याने हि संधी नाकारली असं खडसे यांनी सांगितलं.
माझ्या नावाची शिफारस केली राज्यसभेसाठी होती. मात्र मी राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक नव्हतो असं त्यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीला बोलताना सांगितलं. पक्ष माझ्या बाबत योग्य निर्णय घेईल असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. खडसे यांच्या मागणीकडे पक्ष काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.
दरम्यान, राज्यात ९ विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाआघाडी सरकारतर्फे ६ जागेवर उमेदवार उभे करणार असल्याचे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकाने राज्यपालांकडे मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस काही दिवसापूर्वी केली हाती. मात्र, लॉकडाऊन असल्याने राज्यातील निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.