“माझ घर माझी सुरक्षा माझे वीजबिल मलाच झटका”

भाजपचा ठाकरे सरकारवर खोचक टोला

मुंबई : राज्यात वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये चांगलाच वाद निर्माण झालेला दिसून आला आहे. सामान्यांना वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे  या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्ष भाजपाने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपाकडून या मुद्यावरून राज्यव्यापी वीज बिल होळी आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच मुद्यावरून भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी  ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले केशव उपाध्ये

“सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन त्वरीत खंडित करण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे नवी गाथा माझ घर माझी सुरक्षा माझे वीजबिल मलाच झटका मंत्र्यांना गाड्या, कंत्राटदारांना मलई आणि बिल्डरांना सवलती गोरगरीब मागती दिलासा तर त्यांच्या नशिबी मात्र आश्वासनाचा धत्तुरा”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.