Salman Khan: “माझा मोठा भाऊ…”; सलमान खानची खास मित्रासाठी पोस्ट
Salman Khan: मध्यरात्री १.४० वाजता शेअर केली पोस्ट

Salman Khan: बॉलिवूडचे दोन पॉवरफुल अभिनेते सलमान खान आणि संजय दत्त यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोघेही अनेकदा एकमेकांबद्दल बोलताना दिसतात.
याच दरम्यान सलमानने सोशल मीडियावर संजय दत्तसोबतचे आपले काही अत्यंत खास फोटो शेअर केले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही अतिशय प्रेमाने एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. सलमान आणि संजयचं हे खास बॉन्डिंग चाहत्यांची मनं जिंकत आहे.
सलमानने सोशल मीडियावर केलेली भावूक पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मध्यरात्री १.४० वाजता सलमानने संजय दत्तसोबतचे इन्स्टाग्राम हँडलवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये भाईजानने कॅप, टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे, तर संजय दत्त शर्ट-जीन्स अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये दोघांचे चेहरे पूर्णपणे दिसत नसले, तरी त्यांच्यातील बॉन्डिंग स्पष्टपणे दिसून येत आहे.
View this post on Instagram
संजय दत्तचा ६७ वा वाढदिवस २९ जुलै रोजी झाला होता. त्यानंतर ३१ जुलैला सलमान त्याला भेटला होता. त्यानंतर इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये सलमानने लिहिले, “बाबा, नेहमीच बाबा आणि बाबा म्हणजे बाबाच. संजू बाबा आपल्या सर्वांसाठी ‘बाबा’ आहेत आणि आता आपल्या मुलांसाठीही बाबा आहेत. माझा मोठा भाऊ संजय दत्त. अल्लाह, ईश्वर आणि येशू या माणसाला नेहमी आनंदी ठेवोत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, बाबा.” असे म्हणत सलमानने संजय दत्तवरील प्रेम व्यक्त केले. यानंतर दोघांच्या नात्याचे चाहत्यांनी देखील कौतुक केले आहे. Salman Khan
सलमान खान आणि संजय दत्त यांची मैत्री अनेक दशकांपासून कायम आहे. दोघांनी केवळ वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर रुपेरी पडद्यावरही अनेक भूमिका साकारल्या आहेत. ‘साजन’, ‘चल मेरे भाई’ आणि ‘ये है जलवा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. सलमान खान आणि संजय दत्त नेहमीच एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करताना दिसतात. Salman Khan
हेही वाचा:





