‘मुस्लिम लीग’ एक व्हायरस; योगी आदित्यनाथांचे वादग्रस्त वक्तव्य 

लखनऊ – लोकसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वपक्षीय नेते आक्रमकपणे एकमेकांवर टीका करत आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक पाऊल पुढे जात मुस्लिम लीगला व्हायरस म्हंटले आहे. आणि हा व्हायरस काँग्रेसमध्ये संक्रमित झाल्याची जोरदार टीका योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून केली.

योगी आदित्यानाथ म्हणाले कि,  मुस्लिम लीग एक व्हायरस आहे. एक असा व्हायरस ज्याला संक्रमित झाला तर वाचू शकणार नाही. आजतरी मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसलाच हा व्हायरस संक्रमित झाला आहे. हे जिंकले तर काय होईल याचा विचार करा? हा व्हायरस संपूर्ण देशामध्ये पसरेल, असे टीकास्त्र त्यांनी ट्विटरद्वारे सोडले.

दरम्यान, वायनाडमध्ये राहुल गांधी यांची उमेदवारी दाखल करताना अनेक मुस्लिम लीगचे नेते त्यांच्या रोड शोमध्ये सहभागी झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.