Satara | संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग

सातारा, (प्रतिनिधी) – संगीत हे एक रसायन असून संगीताचा मानसिकतेशी जवळचा संबंध आहे तसेच आपल्या जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे असे प्रतिपादन स्मिता कोरपे यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा व सुहाना सफर ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “मूड्स ऑफ मुकेश” या गाण्याच्या रंगारंग कार्यक्रमात केले.
यावेळी शिल्पा चिटणीस, हेमंत कासार, अनिल वीर, शिरीष चिटणीस, डॉ. श्याम बडवे, सौ. सुरेखा शेजवळ तसेच सुहाना सफरचे प्रमुख विजय साबळे उपस्थित होते. या कार्यक्रमात विजय साबळे,डॉ.लियाकत शेख, वनिता कुंभार, मंजिरी दीक्षित, ममता नरहरी या गायक कलाकारांनी सहभाग घेतला.
“मूड्स ऑफ मुकेश ” या सदाबहार गाण्यांच्या रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात विजय साबळे यांच्या “आ लौट के आजा मेरे मीत ” या सदाबहार गीताने झाली. यानंतर डॉ. लियाकत शेख “मै तो हर मोड पर”, विजय साबळे वनिता कुंभार ” दिल की नजर से ” डॉ.लियाकात शेख व ममता नरहरी ” दिल तडप तडप के केह रहा ” डॉ.लियाकत शेख ” आया है मुझे फिर याद ” विजय साबळे “तुम जो हमारे मीत ना होते” डॉ. लियाकत शेख व मंजिरी दीक्षित ” मेहबूब मेरे मेहबूब मेरे ” यासारख्या गीतांना रसिक श्रोत्यांच्या पसंतीची पावती मिळाली.
यानंतर विजय साबळे व वनिता कुंभार यांचे ” धीरे धीरे बोल कोई सून ना ले “, डॉ.लियाकत शेख व ममता नरहरी ” ये मौसम रंगीन समा “, डॉ. लियाकत शेख व वनिता कुंभार ” फुल तुम्हे भेजा है खत मे “, विजय साबळे, डॉ.लियाकत शेख व मंजिरी दीक्षित ” दिल ने फिर याद किया ” यासारख्या एकापेक्षा एक सरस गीतांनी कार्यक्रम उंचीवर गेला.
या कार्यक्रमांमध्ये डॉ.लियाकत शेख यांच्या ” वक्त करता जो वफा ” विजय साबळे यांचे ” याद आई आधी रात मे “, विजय साबळे व मंजिरी दीक्षित “ओ मेरे सनम ” आणि “इब्तदाये इश्क मे हम ” विजय साबळे व ममता नरहरी ” मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है”, विजय साबळे ” जुबा पे दर्द भरी ” यासारख्या अप्रतिम गीतांना रसिक श्रोत्यांचा वन्स मोर मिळाला. या कार्यक्रमाचा शेवट विजय साबळे यांच्या “जिना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा ” या अजरामर गीताने झाला. दिपाली गीते यांनी निवेदन केले. आग्नेश शिंदे यांनी आभार मानले.





