हत्या कि आत्महत्या ? आई – वडील आणि मुलाचा मृतदेह सापडल्याने रायगड हादरलं

कर्जत : कर्जत तालुक्यातील नेरळ पोशिरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. पती, पत्नी आणि मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मदन पाटील असं आहे. मदन पाटील यांच्यासह त्यांची पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह घरामागील ओढ्यात सापडला. धक्कादायक म्हणजे मदन पाटील यांची पत्नी 7 महिन्यांची गरोदर होती.
हत्या कि आत्महत्या?
पाटील कुटुंबाने स्वत:चं आयुष्य संपवलं की त्यांची हत्या करण्यात आली, याचा तपास पोलीस करत आहेत. आज सकाळी ओढ्यावर काही नागरिक गेले असता त्यांना मुलाचा मृतदेह आढळून आला. यानंतर काही वेळेत महिलेचा आणि त्यानंतर मदन पाटील यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात सापडला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
आई आणि मुलाचा मृतदेह नाल्यात तर मदन पाटील यांचा मृतदेह घरात सापडल्यामुळे या मृत्यूचे गूढ अजून वाढले आहे. या तिघांनी आत्महत्या केली आणि त्यांचा कोणी खून केला याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.





