एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून

पिंपरी – लग्नास नकार दिल्याने एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करण्यात आला. ही घटना खेड तालुक्यातील आंबेठाण येथे घडली.
प्राची विजय माने (वय २१, मुळगाव उरुण-इस्लामपुर, ता. वाळवा जि. सांगली. सध्या रा. आंबेठाण ता. खेड जि.पुणे) असे एकतर्फी प्रेमातून खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. अविराज खरात (रा. बहे ता. वाळवा जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाकडून म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हददीत आंबेठाण येथे एका तरुणीचा खून झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता आरोपीने प्राची हिचा मोबाइल देखील त्याने पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने सोबत नेला होता. या गुन्ह्याच्या तपासाकरिता दोन पथके तयार केली. त्यातील एक पथक आरोपीच्या गावी तर दुसरे आरोपीच्या गाडीचा माग काढत होते.
आरोपी अविराज हा सातारा ते कराड रस्त्याने चालला असल्याची माहिती एका पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुमारे १५ किलोमीटर आरोपीचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन मोबाइल व दुचाकी ताब्यात घेतली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे, विठठल सानप, वीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, रामदास मेरगळ, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, सुधिर दांगट, समीर काळे, शशिकांत नांगरे, राहुल सुर्यवंशी, तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.





