बजरंगी भाईजान या चित्रपटात मुन्नी हे पात्र साकारणारी हर्षाली मल्होत्रा तिच्या डान्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये हर्षाली करिना कपूरच्या चमेली चित्रपटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ हर्षालीच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडिओमध्ये हर्षालीची उंची पाहून “मुन्नी किती मोठी झाली’ अशी प्रतिक्रिया यूजर्सने दिली आहे.
View this post on Instagram
हर्षाली मल्होत्रा 2014 मध्ये बजरंगी भाईजान या चित्रपटात सलमान खानसोबत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या मुक्या अभिनयाचे कौतुक केले गेले होते.मात्र, त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. सध्याच्या या व्हिडिओमुळे अनेकांनी मुन्नीला पाहून आनंद व्यक्त केला आहे.