Munjya On OTT | आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत या चित्रपटाने 64 कोटींची कमाई केली आहे. मात्र आता हा चित्रपट तुम्हाला घरबसल्या देखील पाहता येणार आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज होणार आहे. या चित्रपटातील मराठी कलाकारदेखील सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. यात अभय वर्मा आणि शर्वरी वाघ यांची प्रमुख भूमिका आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar ने विकत घेतले आहेत. त्यानंतर आता हा चित्रपट ऑगस्टदरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याची शक्यता आहे. कॉमेडी एंटरटेनमेंटने भरलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. ‘मुंज्या’ची निर्मिती दिनेश विजन यांनी केली आहे. तर दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. ‘मुंज्या’मध्ये शर्वरी वाघ, मोना सिंग आणि अभय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय यात मोना सिंग, सत्यराजया, सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, अजय पूरकर हे कलाकारही आहेत. सध्या या कलाकरांचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे. Munjya Film on Actress Sharwari| हेही वाचा: आलिया भट्ट रणबीर कपूर ‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार ‘एकत्र’