अभिनेत्री शर्वरी वाघने अमिताभ बच्चन यांच्यासोबतच सांगितला 3 वर्ष ‘जुना किसा’

bollywood news । शर्वरी वाघचा ‘मुंज्या’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. आदित्य सरपोतदारच्या या चित्रपटाने आतापर्यंत 104 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या यशाने शर्वरी खूपच खूश आहे. तीन वर्षांपूर्वी शर्वरीने राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांच्या ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
आपल्या 9 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत शर्वरीने अनेक दिग्गज कलाकारांसोबत कॅमेऱ्यासमोर आणि मागे काम केले आहे. अशात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने अमिताभ बच्चन यांच्याकडून टिळक खूप काही शिकायला मिळाले असेही सांगितले आहे.
शर्वरी वाघ म्हणाली, ‘बंटी और बबली 2 च्या प्रमोशनदरम्यान मी अमिताभ बच्चन यांना भेटणार होते. खरंतर आम्ही त्याच्यासोबत केबीसीचा एक एपिसोड शूट करणार होतो. मी खूप घाबरले होते, त्यावेळी माझ्यासोबत सिद्धांत चतुर्वेदीही उपस्थित होता तोही माझ्यासारखाच घाबरला होता. अमिताभ बच्चन यांना आपण कसे भेटू हे समजत नव्हते. त्यांच्याशी काय बोलणार? मनात भीतीही होती. मला अजूनही आठवतं की प्रॉडक्शन तयार झाला आणि आम्हाला वेटिंग रूममध्ये बोलावलं. आम्ही वेटिंग रूममध्ये थांबलो होतो आणि अचानक अमिताभ बच्चन तिथे आले. त्यांनी मागून येऊन आम्हाला घाबरवले. आम्ही क्षणभर घाबरलो. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आमच्याशी सहज संवाद साधला आणिआमची आमची भीती दूर झाली.
शर्वरी म्हणाली, “अमिताभ सर यांना दुरूनच कळाले होते की आम्ही नवीन कलाकार आहोत आणि आम्ही सर्व त्यांना भेटायला घाबरत आहोत. आम्हाला छान वाटावा म्हणून त्यांनी आम्हाला अशा प्रकारे घाबरवले. तेव्हा सर आमच्याशी खूप प्रेमाने बोलले. आम्हाला आदर दिला. त्यांना बघून मी खूप काही शिकले.’





