मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर १६ जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी भाजपा आणि शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुती सोबत आणि महायुती शिवाय लढण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी पूर्ण केली आहे. मुंबईत किमान 50 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण मुंबईत किमान 50 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण झाल्याचे समजत आहे. महायुतीत राहायचे की नाही हा निर्णय अजित पवार घेणार असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात प्रमापत्र सादर करणं बंधनकारक असणार आहे. 29 महापालिकेमधील 2869 जागांसाठी मतदान होणार आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंनी घेतली अमित शाहांची भेट आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यात जिथे युती करणे शक्य असेल तिथे युती करा, अशी अमित शाह यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना सूचना दिल्या आहेत. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गेल्यास अमित शाह यांना काहीच हरकत नसल्याचे म्हंटले आहे. ते लवकरच महाराष्ट्रातील भाजपा नेतृत्वासोबत बोलण्याचं देखील आश्वासन देखील अमित शाह यांनी यावेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंना दिलं. निवडणुकीसंदर्भात महत्वाच्या तारखा 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर – उमेदवार अर्ज स्वीकारणे 31 डिसेंबर – अर्जाची छाननी 2 जानेवारी 2026 – उमेदवारी माघारी घेण्याची तारीख 3 जानेवारी – अंतिम उमेदवार यादी 15 जानेवारी – मतदान 16 जानेवारी – मतमोजणी