पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कोविड केअर सेंटर, दवाखाने व रुग्णालयांमध्ये शंभर डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमण्यात येणार आहेत. ही निवड तीन महिन्यांसाठी केली जाणार आहे. त्यांना दरमहा 19 हजार 250 मानधन दिले जाणार आहे.
शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी पालिकेच्या रुग्णालय, दवाखाने व कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तेथील कामकाजासाठी पालिका 100 डाटा एन्ट्री ऑपरेटर नेमणार आहेत. तसेच ऍन्टीजेन टेस्टचे डाटा एन्ट्री करण्यासाठी 40 ऑपरटेरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या 3 महिन्यांच्या वेतनासाठी 23 लाख 10 हजार खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे करोनाकाळात आपली नोकरी गमाविलेल्या तरुणांना नौकरीची संधी मिळणार आहे.